मालवणचो झील आयर्लंडचो पंतप्रधान झालो

मराठी माणसाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न  साकार झाले आहे. भारतात नाही, तर चक्क आयर्लंडमध्ये. पार सातासमुद्रापलीकडच्या आयर्लंडवर झेंडा रोवणारा हा कोकणी मालवणी माणूस आहे लिओ वराडकर.

एक मराठी माणूस लिओ वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला. लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिनमध्ये झाला. त्यांची आई आयरिश आहे.

सध्या लिओ आयर्लंडच्या मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्री आहेत. पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता सत्ताधारी फाईन गिल पक्षामध्ये पंतप्रधानपदाची शर्यत सुरू झाली. यामध्ये वराडकरांचं नाव आघाडीवर होत.

वराडकर यांच्यासमोर गृहनिर्माण मंत्री सिमोन कोवेनी यांचं आव्हान होते. मात्र वराडकरांना पाठिंबा वाढत होता. पहिल्यापासून ते आघाडीवर होते. लिओ वराडकर हे आयर्लंडचे पहिले समलिंगी मंत्री आहेत. त्यांनी समलिंगी विवाहाच्या अधिकारासाठी त्या देशामध्ये यशस्वी लढा दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *