आयएनएस राणावर खलाशी मृतावस्थेत

भारतीय नौदलाच्या आयएनएस राणा या विनाशिकेवर गुरुवारी सकाळी एका खलाशाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. त्याच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विकास यादव याने स्वत: गोळ्या झाडून आत्महत्या केली की त्याच्या बंदुकीतून अपघाताने गोळी झाडली गेली, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *