पुरुषांनो, महिला कर्मचाऱ्यांशी नीट वागा, अन्यथा..

महिला कर्मचाऱ्यांशी केल्या जाणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तनाबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश देतानाच पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी कसे वागावे आणि कसे वागू नये याबाबत प्रत्येक कार्यालयाने मार्गदर्शिका तयार करावी आणि ती लागू करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातील निकालाचा दाखला देताना न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले. तसेच लैंगिक गैरवर्तन हे एकांगी पाहता येणार नाही. त्याला दुसरी बाजूही आहे आणि मालक वा कंपनी व्यवस्थापनाने अशा गैरवर्तनातील धोका लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने याच निकालाचा दाखला देत नमूद केले.

केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठाविरोधात केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हे आदेश दिले. कंपनी व्यवस्थापनाने लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याकडे नि:पक्षपातीपणे पाहायला हवे. आता कंपनी व्यवस्थापन वा कार्यालयीन व्यवस्था काळानुसार बदललेली आहे. त्यामुळेच महिला कर्मचाऱ्यांशी केल्या जाणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तनाबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *