‘आर्ची’सोबत खेलैया दांडिया..!

आपल्या  अभिनय व संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या  आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरूची एक झलक पाहण्यासाठी कोल्हापुरातील झिंगाट तरुणाईने    मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉनवर एकच गर्दी केली होती. निमित्त होते कस्तुरी कल्ब आणि जे. के. इन्स्टिंक्ट मेडिया आयोजित खेलैया 2016 नवरात्री उत्सवाचे. ‘सैराट’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रथमच कोल्हापुरात आलेल्या रिंकू राजगुरूने चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे  आभार मानले.  नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने  आयोजित या कार्यक्रमात आर्चीसोबत  दांडिया नृत्य करण्यासाठी तरुणाई खास वेशभूषा करून सहभागी झाली होती.
कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा वाजता होती, पण खास आर्चीला पाहण्यासाठी  आबालवृद्धांनी पाच वाजल्यापासूनच मुस्कान लॉनवर गर्दी केली. कार्यक्रमस्थळी जाताना वाहनातून तरी आर्चीला पाहता यावे यासाठी तरुणाईने लॉनच्या बाहेर असणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. रात्री नऊ वाजता आर्चीचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.  पिवळ्या रंगाचा चुडीदार परिधान करून आलेल्या आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरूने प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन केले.  यावेळी तरुणाईने अक्षरश: सुरक्षा कडे तोडत   बॅरेकेटस्वरून उड्या मारून आर्चीची एक छबी कॅमेराबद्ध करण्यासाठी स्टेजकडे सरसावली. कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी  रिंकू राजगुरूचे स्वागत केले.
यानंतर आर्चीने कोल्हापूरकरांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्रौत्सवातील गरबा नृत्याचे आपल्याला कायमच आकर्षण असल्याचे सांगितले. ‘सैराट’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्र्रतिसाद दिला त्याबद्दल आभार मानले. यानिमित्ताने गरबा नृत्य स्पर्धेचे तसेच बेस्ट गु्रप डान्स, बेस्ट शृंगार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *