पुण्याच्या श्रद्धा कक्कडने यंदाचा मिसेस युनायटेड नेशन्स किताब पटकावला आहे. जुलै महिन्यात जमैका येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक दाखल झाले होते.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते. याचवर्षी मिसेस इंडिया होममेकर या स्पर्धेत उपविजेती ठरल्यानंतर श्रद्धा कक्कडची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. अखेर श्रद्धाने मिसेस युनायटेड नेशन्स किताबावरही नाव कोरले.