रक्षाबंधनाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर उद्या, रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारऐवजी आज, शनिवारी मध्यरात्री वसई आणि विरार स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरारमध्ये शनिवार, २४ ऑगस्ट रोजी धीम्या मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
