भंडारा जिल्ह्यात घराचे छत कोसळून तिघे ठार

भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगावमध्ये जोरदार पावसामुळे एका घराचे छत कोसळून कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आज मंगळवारी पहाटे ४.३० वाजता ही घटना घडली. सुकरू दामाजी खंडाते (३२), सारिका सुकरू खंडाते (२८) आणि सुकन्या सुकरू खंडाते (०३) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

मुळचे पारशिवनी तालुक्यातले सुकरू खंडाते हे राजेदहेगावमधील जवाहरनगर येथे पोलीस पाटील मधुकर ढोबळे यांच्या शेतीच्या कामासाठी वार्षिक रोजंदारीवर काम करीत होते. ते जवाहरनगरमध्ये नारायण ढोबळे यांच्या घरी भाडे तत्वावर आपल्या पत्नी आणि मुलीसह राहात होते. पावसामुळे घराचे छत पहाटे कोसळले आणि खंडाते कुटुंबीयांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *