दोन अल्पवयीन मुलींवर ११ नराधमांनी केला बलात्कार

मदतीसाठी आलेल्या ११ तरुणांनी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना झारखंड मध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकराही आरोपींना अटक केली आहे.

झारखंडमधील हिरही हिरा टोली परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली गुरुवारी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत बाहेर फिरायला निघाल्या. गावातील रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे त्यांची दुचाकी बंद पडली. यानंतर त्या दोन्ही मुलींनी मदती साठी गावातील एका तरुणाला फोन केला. त्याने काही मित्र पाठवतो असे सांगितले. काही वेळाने ११ जण तिथे पोहोचले. या नराधमांनी त्या मुलींना निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण करून तिथून पळवून लावले. आरोपींनी मुलीकडील मोबाईल फोन देखील चोरले होते.  पिडीत मुलींनी गावी आल्यावर नराधमाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. अखेर रविवारी पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली. सर्व आरोपी हे १८ ते २८ या वयोगटातील आहे.

अमित बाडा, किशोर प्रवेश खाखा, सोहन बाडा, डबलू उरांव, छोटू उरांव, प्रदीप उरांव, रोशन बाडा, भोला खाखा, अजय उरांव, नरेंद्र कुजूर और चंदा उरांव अशी या आरोपींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *