मुंबई महापालिकेतले मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी काल रात्री अटक केलीय. ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. तुर्डे यांच्या वॉर्डात शौचालयाचं काम करण्यात ठेकेदारानं दिरंगाई केल्याचा आरोप आहे.
स्थानिक राजकीय पक्षांचेही राजकारण तापल्याची चर्चा
दरम्यान, तुर्डेंनी मारहाण केल्याचं पुढे येत आहे. या प्रकरणात स्थानिक राजकीय पक्षांचेही राजकारण तापल्याची चर्चा आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे शौचालय बांधकामात अडथळे आणत होते. लांडेंचीच ठेकेदाराला फूस होती अशी स्थानिक पातळीवर चर्चा रंगतेय.
मनसेच्या गोटात चांगलीच चर्चा
संपूर्ण महापालिकेत एकमेव असलेल्या नगरसेवकावरही कारवाई झाल्याने मनसेच्या गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे.
