जम्मू काश्मीर : कुपवाडातील तंगधारमध्ये दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. मात्र भारतीय जवानांनी त्यांचा हा विचार हाणून पाडला. दहशतवाद्यांशी दोन हात करताना एका भारतीय जवानाला आपले प्राण गमवावे लागले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी तंगधार सेक्टरच्या नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय सेनांनी हा त्यांचा विचार हाणून पाडला. या दरम्यान शिपाई पुष्पेंद्र सिंह शहीद झाले आहेत. सेनेच्या बदामीबाग मुख्यालयात एका कार्यक्रमात शिपाई पुष्पेंद्र सिंह यांना श्रद्धांजली वाहिली जाईल.

स्वातंत्र्य दिवसानिमित्त जम्मू काश्मीरची सुरक्षा वाढवली उद्या 15 ऑगस्ट या निमित्ताने काश्मीर घाटी आणि राजधानी श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जीजीपी एस पी वैद यांनी सांगितलं की, येथील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली असून पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *