मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूकही मंगळवारी सकाळी मंदावली आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ टँकरमधून तेल सांडल्याने वाहतूक मंदावली असून वाहने घसरण्याचा धोका असल्याने वाहने धिम्यागतीने पुढे जात आहेत. यामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ पहाटे चारच्या सुमारास टँकरमधून तेलगळती झाली. रस्त्यावर तेल सांडल्याने वाहने घसरण्याचा धोका होता. शेवटी तिथे माती टाकून वाहतूक सुरु करण्यात आली. माती टाकली तरी वाहने घसरण्याचा धोका कायम असल्याने वाहने धिम्यागतीने पुढे जात आहेत. अवजड वाहने संथगतीने पुढे जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
