फुरसुंगीत भीषण अपघात; कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

फुरसुंगी येथील सोनार पूल येथे घडलेल्या भीषण अपघातात कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. सोनार पुलाचा कठडा तोडून कार पाण्यात कोसळली. या अपघातात नितीन कुंभार या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला.

पाण्यात बुडाली कार

मूळचे सासवडचे असणारे कुंभार हे लोणी काळभोर इथल्या एंजल हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षक होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान पोहचण्याआधीच मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. तर, कार पाण्यातच बुडालेल्या आवस्थेत होती.

आत्मियता असलेले प्रशिक्षक

नितीन कुंभार हे अत्यंत मेहनती आणि कराटे खेळाबद्धल प्रचंड आत्मियता असलेले प्रशिक्षक होते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये नाव मिळवून दिले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा शिक्षक अशी त्यांची ओळख होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *