वरळीत नेरोलॅक पेन्टसच्या गोदामाला भीषण आग

वरळीत श्रीराम मिल जवळच्या नेरोलॅक पेन्टसच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या १२ गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. लेव्हल २ ची ही आग आहे.

नेरोलॅक ही रंगांची निर्मिती करणारी कंपनी आहे. गोदामामध्ये रंगाचे साहित्य ठेवण्यात आले होते अशी माहिती आहे. वरळीतील श्रीराम मिलचा परिसर वर्दळीचा रस्ता आहे.

हा गजबजलेला भाग असल्याने आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या या मार्गावर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *