यवतमाळ जिल्ह्यात वाघाने रोखली वाहतूक

पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा ते करंजी रस्त्यावर गुरुवारी सकाळी ७ वाजता एका वाघाने ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल अर्धा तास हा वाघ रस्त्यावर ठिय्या देऊन होता. पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा परिसरात काही दिवसांपासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्याने आत्तापर्यंत चौघांचा बळी घेतला असून अनेक जनावरांनाही भक्ष्य केले आहे.
गुरुवारी सकाळी पुणे येथील परिवार परतीच्या प्रवासात असताना वाठोडा गावाजवळ जंगलात एक वाघ रस्त्यावर येऊन थांबला. त्याचवेळी वनविभागाचे वाहनही आले. वाघ पाहून सर्वांचr पाचावर धारण बसली. मात्र वनविभागाच्या कर्मचा-यांनी आपल्या मोबाईलने या वाघाला कॅमे-यात कैद केले. वाघ निघून गेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *