दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करु – मुंबई पालिका

दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन आज मनसेच्या शिष्टमंडळाला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. आज मनसेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली.

मुंबईतल्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून त्याची प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठी हे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्तांना भेटलं.

मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरींवर मुख्य अभियंते संजय दराडे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. आज त्यांची कोठडी संपली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *